Agriculture News and Jobs

For Clean, Smart and Profitable Farming.

Krishi News

पीक आणेवारी ठरवण्यासाठी अँड्रॉईड अॅपचा वापर

तंत्रज्ञानाचा वापर आता शेतीमध्येही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्याचबरोबर सरकारचा देखील शेती तंत्रज्ञानावर भर आहे. व्यवहारात पारदर्शकता ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होतो. त्याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने आता पीक कापणी प्रयोगाचे निष्कर्ष काढण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्याच्या सूचना प्रत्येक जिल्ह्याला दिल्या आहेत.

सविस्तर वाचा...

वायरलेस ठिंबक सिंचन योजना- शेतकऱ्यांसाठी वरदान

अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीतून मोठे उत्पादन घेतात. सांगलीच्या कवलापूरमधील शेतकऱ्यांनीही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने क्षारपड जमिनीवर द्राक्षाचं पिक घेतले आहे. वायरलेस ठिबक सिंचनाच्या माध्यमातून सांगलीतील शेतकरी द्राक्षाचं भरघोस पिक घेत आहेत.

सविस्तर वाचा...

बँकांनी शेतकऱ्यांसाठी ई-पेमेंट सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना ई-पेमेंटद्वारे खते, बि-बियाण्यांची खरेदी करता यावी, यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे. बँकांनी राज्य सरकारच्या सुचनेनुसार शेतकऱ्यांना ई-पेमेंट खरेदी करण्यासाठी खास सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

सविस्तर वाचा...

पीक विमा काढलेला नसला तरीही शेतकऱ्यांना भरपाई मिळणार

शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एक मोठं पाउल उचलले आहे. ज्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत विमा काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतंर्गत भरपाईची जी रक्कम दिली जाते, त्या रकमेच्या 50 टक्के रक्कम शासनाकडून मदत म्हणून देण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

कोल्हापुरातील ४५ हजार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले.

मुंबई उच्च न्यायालयाने, कोल्हापूर जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांनी ३१ मार्च १९९७ ते ३१ मार्च २००७ या काळात घेतलेले पीककर्ज माफ करा, असा आदेश दिला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे एकूण ११२ कोटी रूपयांचे कर्ज माफ होणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सविस्तर वाचा...

शेती आणि ग्रामीण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात १, ८७,००० कोटींची तरतूद

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेती आणि ग्रामीण क्षेत्रासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली. यंदाच्या अर्थसंकल्पात शेती आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी गतवर्षीपेक्षा २४ टक्क्यांनी जास्त म्हणजे १, ८७,००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

नाशिक व वर्धा जिल्ह्यात ऑनलाईन सातबाऱ्याला सुरवात.

आपले सरकार केंद्राच्या माध्यमातून शेतकऱयाांना ऑनलाईन सातबारा उतारा देण्यासाठी जिल्ह्या प्रशासनाने या कामाला गती द्यावी, असे आवाहन मुख्यमांत्री देवेंद् फडणवीस याांनी येथे केले.

सविस्तर वाचा...

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीक कर्जावरील व्याज माफ.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीककर्जावरील व्याज केंद्र सरकारनं माफ केलं आहे. या निर्णयाने एकूण 660 कोटी रुपयांचं व्याज सरकारनं माफ केलं आहे.

सविस्तर वाचा...

18 कीटकनाशकांच्या वापरावर केंद्राकडून बंदी

18 कीटकनाशकांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय कृषी मंत्रालयाने घेतला आहे, कारण हे कीटकनाशक मानवी आणि पशु-पक्षांना हानिकारक आहेत. यासंबंधित आदेश संबंधित विक्रेता, निर्माता आणि राज्य सरकारला केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.

सविस्तर वाचा...