Agriculture News and Jobs

For Clean, Smart and Profitable Farming.

Agriculture Information In Marathi

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीककर्जावरील व्याज माफ

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला की नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील पीककर्जावरील व्याज केंद्र सरकारनं माफ केलं आहे. या निर्णयाने एकूण 660 कोटी रुपयांचं व्याज सरकारनं माफ केलं आहे.

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरण्यांसाठी सहकारी बँकांकडून अल्पमुदतीचे कर्ज घेतलं होतं. नोटाबंदीनंतर सर्वाधिक जास्त फटका हा मजूर आणि शेतकरी वर्गाला बसला. पण या काळातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करुन केंद्र सरकारने पीककर्जावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी यासंबंधी माहिती दिली.

याशिवाय या बैठकीत आयआयएममधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा ऐवजी आता डिग्री, तर पदविका ऐवजी पदवी प्रधान करणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे.

Source: http://www.pib.nic.in/