Agriculture News and Jobs

For Clean, Smart and Profitable Farming.

Agriculture Information In Marathi

खरीप पिकाचे बीजोत्पादन तंत्रज्ञान मार्गदर्गन कार्यक्रमाचे आयोजन

बदलत्या स्पर्धात्मक परिस्थितीत शेतकरी बंधू भगिनींनी केवळ बाजारू बियाणांचे खरेदीदार न राहता योग्य प्रशिक्षण पद्धतींचे प्रभावी अंमलबजािणीद्वारे घरघुती बियाणे उत्पादित करीत शाश्वत शेतीचा मूलमंत्र अंगीकारावा असा संदेश वजा सल्ला डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ प्रदीप इंगोले यांनी दिला.

खरीप पिकाचे बीजोत्पादन कार्यक्रमास गती देण्याच्या दृविकोनातून बियाणे सनियंत्रण कक्ष, संशोधन संचालनालय , डॉ. पंदेकृवि, अकोला यांचे वतीने राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत आयोजित तीन दिवसीय खरीप पिकाचे बीजोत्पादन प्रवर्क्षण कार्यगक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.

दरवर्षी गुणवत्ता, प्रत, विश्वासहार्यगता माहित नसलेले नविन बियाणे बाजारातून खरेदी करायचे आणि उगवण पश्चात फसगत झाल्यास इतरांना दोष देत हंगाम हातातून घालवायचा असे न करता अगदी घरचेघरी, गटाच्या माध्यमातून अगदी नगण्य खर्चात विश्वासपात्र बिजोत्पादन केवळ स्वता पुरते न करता गाव पातळिवर राबवावे व शेतीला फायदेशीर बनवावे.

शेतकरी सदनाच्या कृषिजागर सभागृहात दि. २७ फेब्रुवारी ते १ मार्च, २०१७ या तीन दिवसीय कालावधीकरता आयोजित प्रशिक्षण कार्यगक्रमाचे उदघाटन डॉ. पी. जी. इंगोले, संचालक विस्तार शिक्षण, डॉ. पंदेकृवि, अकोला यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी विचारमंचावर श्री एस. एम. पुंडकर, महाव्यवस्थापक (उत्पादन), महाबीज, अकोला, डॉ. एस जी. वानखडे, सहयोगी संशोधन संचालक, डॉ. पंदेकृवि, अकोला आणि डॉ. आर. एस. नंदनवार, विभाग प्रमुख, डॉ. पंदेकृवि, अकोला यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ डी. टी. देशमुख, उपसंचालक (बियाणे), डॉ. पंदेकृवि, अकोला यांनी तर सूत्र संचालन तथा आभार प्रदर्शन श्री के जी भाकरे यांनी केले. प्रशिक्षणामध्ये बार्शिटाकळी तालुक्यातील पुनोती, रहित, राजंदा, टिटवा, कान्हेरी सरप या गावातील महाबीज बीजोत्पादकांनी आणि बार्शीटाकळीतील युवा संघटना अकोला तर्फे शेतकऱयांनी सहभाग नोंदविला आहे.

Source: https://www.pdkv.ac.in/