Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

खरीप पिकांवरील खुरपडीचे नियंत्रण

खरीप पिकाची पेरणी झाल्याबरोबर खुरपडीचा प्रादुर्भाव पिकांवर रोपावस्थेत होतो. खूरपडी म्हणजे विविध प्राण्यांचा एकत्रीत प्रादुर्भाव यामध्ये पक्षी, खार,वाणी, नाकतोडे, वायवर्म इत्यादींचा सामावेश होतो. ह्या किडींचा प्रादुर्भाव बहुभक्षी असून एकदल, व्दिदल, दाळवर्गीय, तेलवर्गीय पिकांवर दिसून येतो.

जमिनीतील किडींच्या प्रादुर्भावाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत,
मे व जून महिन्यात पाऊस हलका व तुरळक तसेच 200 ते 250 मि.मि.पेक्षा कमी पडल्यास जमिनीतील किडींच्या जीवनचक्रास चालना मिळून त्यांचे प्रजोत्पादन झपाट्याने होते.
परंतू दोन ते तीन वेळा भारी वारंवारतेचा पाऊस झाल्यास ही किडी जमिनीत दबून नष्ट होतात व प्रादुर्भावात लक्षणीय घट होते.
पडीत गवताळ जमिनी प्रजोत्पादनासाठी उपयुक्त असतात.
भूस भूशीत व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमिन वायावर्मच्या (काळ्या म्हशीच्या) वाढीस अत्यंत उपयुक्त असते.

वायावर्म (काळ्या म्हशी) या किडीसाठी पेरणीपूर्वी शेताचे सर्वेक्षण करावे, किडींची संख्या जाणून घेण्यासाठी शेतातील अडम धडम प्रति एकर 20 ठिकाणे निवडावी व प्रत्येक निवडलेल्या ठिकाणची 1 फुट X 1 फुट X 0.50 फुट याप्रमाणे माती गोळा करावी अळ्या/ प्रौढची संख्या मोजावी 20 ठिकाणची सरासरी काढावी. किंवा 20 ठिकाणी गव्हाच्या बियाण्याचे आमिष सापळे ठेवावे व त्या अळ्या/ प्रौढ आढळल्यास ते मोजावे.

बियाण्याचे आमिष सापळ्यांकरीता, गव्हाचे पीठ दीड कप + मध दोन चमचे + पानी अर्धा कप मिश्रणाच्या गोळ्या बनवून कांदे साठवण्याच्या पोत्याच्या छोटया तुकड्यामधे बांधून जामिनीत 10 ठिकाणी झेंडे लावून गोळ्या 4 ते 6 इंच खोलगाडाव्या व 4 ते 5 दिवसांनी हे अमिष किडींसाठी तपासून पहावे. या पद्धतीने आपल्याला प्रादुर्भाव असल्याची माहिती मिळते.

याच्या नियंत्रणासाठी 1. पक्षी व खारी यांपासून पिक वाचवण्यासाठी शेताची राखण करावी.
2. वाणीचे समुह गोळा करून नष्ट करावे.
3. सेंद्रिय पदार्थ / पिकांचे अवशेष / किडींची हंगामापूर्वी विल्हेवाट लावावी तसेच न कुजलेल्या सेंद्रिय खतांचा वापर करू नये. त्यामुळे वाणी, वायरवर्म ईत्यादी यांचे प्रजोत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.
4. नाकतोड्याच्या नियंत्रणासाठी धुऱ्यावरील गवताचा वेळोवेळी नायनाट करावा व धुरे स्वच्छ ठेवावे.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com