Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

मोसंबी पिकावरील डिंक्या (फायटोप्थोरा) रोगाचे व्यवस्थापन

मोसंबी पिकावरील डिंक्या रोगाची लक्षणे:
रोपवाटिकेत रोपे कोलमडून पडतात कारण, फायटोप्थोरामुळे 20% रोपे रोपवाटिकेतच मरतात.
रोपवाटिकेतील रोपांच्या मुळांना रोगांची लागण होऊन मुळे कुजतात आणि त्यामुळे झाडांची वाढ खुंटते.
पाने पिवळी पडतात आणि गळायला लागतात. नंतर रोपटयांच्या खोडावर डिंक स्रवतो.
खोडावर लागण होताच सालीवर ठिपके दिसण्यास सुरवात होते.जमिनी लगत झाडाच्या खोडाला रिंग पडतात.
फायटोप्थोरा मुळ किंवा कॉरटेक्समधून मुळाच्या आत शिरतो. आणि मुळास प्रार्दुभाव झाल्यास ती कुजतात.
रोगग्रस्त भागावरील साल सुटतेव खोडाचा भाग उघडा पडतो.
प्रार्दुभावात खोड व फांदीवर डिंक तयार होऊन स्नवतो.
रोगाची लक्षणे खोडावर व फांदयांवर दिसुन येतात.
कधी कधी खोडावर स्रावांमुळे नेलकट डाग दिसतात.
डिंक असलेल्या सालीचा भाग गडद लाल होतो आणि नंतर तो वाळतो व सालीला उभ्या चिरा पडतात.

मोसंबी पिकावरील डिंक्या रोगाचे व्यवस्थापन:
योग्यमशागतीचा अवलंब करणे:
या रोगाची बुरशी जमिनीत राहत असल्यामुळे निचा समूळ नायनाट करणे अशक्य आहे. पण मशागतीत योग्य फेरफार केल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो.

बुरशीनाशकाचा वापर:
पावसाळ्याआधी व पावसाळ्यानंतर वर्षातून 2 वेळा बोर्डो पेस्ट खोडास जमिनीपासून 3 ते ४ फूट उंचीपर्यंत लावावे.
पेस्ट लावण्यापूर्वी मेटॅलॅकिझल किंवा कासेटिल ए्ल या बुरशीनाशकाचा मलम साल काढलेल्या जागेवर लावावा.
१% बोर्डोमिश्रणाच्या फवारणीसाठी १ किलो मोरचूद, १ किलो चुना, प्रति १००लीटर पाण्याचे द्रावण जमिनीवर वगळालेल्या फळांवर फवारावे.
झाडांवर मेटॅलॅकिझल २.५ ग्राम/ लीटर किंवा फोसीटेल अल २.५ ग्राम/ लीटर या प्रमाणात झाडांवर तसेच शेजारची जमीन ओली होईपर्यंत फवारावे.

रोगप्रतिकारक खुंटाचा वापर: रंगपूर लाईम या रोगास सहनशील आहे म्हणुन या खुंटाचा वापर करावा.

Source: http://www.mahaagri.gov.in/

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com