Agriculture News and Jobs

For Clean, Smart and Profitable Farming.

Agriculture Information In Marathi

18 कीटकनाशकांच्या वापरावर केंद्राकडून बंदी

नवी दिल्ली: 18 कीटकनाशकांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय कृषी मंत्रालयाने घेतला आहे, कारण हे कीटकनाशक मानवी आणि पशु-पक्षांना हानिकारक आहेत. यासंबंधित आदेश संबंधित विक्रेता, निर्माता आणि राज्य सरकारला केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने म्हटलं आहे की बंदी घालण्यात आलेल्या कीटकनाशकांपैकी 12 औषधांवर 1 जानेवारी 2018 पासून, तर उर्वरित सहा औषधांवर 31 डिसेंबर 2020 पासून बंदी घालावी, असं म्हटलं आहे.

पक्षी, प्राणी आणि मानवी शरिरासाठी या औषधांचा वापर धोकादायक असल्याचं कृषी मंत्रालयाच्या अहवालात म्हटलं आहे. इतर देशांमध्ये या औषधांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे.

या औषधांवर अभ्यास करण्यासाठी जुलै 2013 मध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेचे माजी प्राध्यापक अनुपम वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मंत्रालयाने समिती नियुक्त केली होती. या समितीच्या शिफारशीनंतर या औषधांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

66 असे औषध आहेत जे भारतात वापरतात पण त्या औषधांवर परदेशात बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र भारतात याचा वापर सुरुच असल्याचा अहवाल या समितीने दिलाय.

Source: http://abpmajha.abplive.in/