Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

शेतकऱ्यांसाठी बळीराजा चेतना अभियान

महसूल व वन विभाग शासन निर्णय दि.२४ जुलै, २०१५ नुसार बळीराजा चेतना अभियाना अंतर्गत यवतमाळ जिल्हयातील १८४८ गावामध्ये ग्रामस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे व रू. 1 लक्ष याप्रमाणात निधी संबंधित ग्रामस्तरीय समित्यांना वितरीत करण्यात आला आहे.

गावातील पिडीत कुटुंबाच्या सर्वेक्षणाच्या कामाकरीता प्रति ग्राम स्तरीय समितीस रु.5,000/- प्रमाणे अनुदानाची तरतुद करण्यात आली आहे. यानुसार गावातील अडचणीतील कुटुंबाची यादी ग्रामस्तरीय समितीमार्फत तयार करण्यात येते.

गावातील पिडीत कुटुंबांना प्रति कुटुंब रु.5,000/- च्या कमाल मर्यादेत एकूण 6 कुटुंबांना एकूण रु.30,000/- ची तरतुद पेरणी/बियाणे करीता करण्यात आली आहे. गावातील त्रस्त कुटुंबाना पेरणी/बियाणे याकरीता ग्रामस्तरीय समिती मार्फत मदत करण्यात येत आहे.

सदर कुटुंबाचे नाव ग्रामस्तरीय समितीमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील यादीत असावे, अल्पभूधारक शेतकरी असावा, शेती शिवाय उत्पन्नाचे अन्य कोणतेही साधन नसावे.

ग्रामस्तरीय समितीमार्फत मदत मिळण्याकरीता ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष सरपंच किंवा समितीचे सदस्य सचिव तथा ग्रामसेवक यांचेकडे संपर्क करावा.

योजने अंर्तगत कर्करोगग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक आधार देण्याकरीता रूपये १०,०००/-(दहा हजार रूपये) अनुदान देण्यात येते. योजने अंर्तगत शेतकरी कुटुंबातील पाल्याना(मुले/मुली) यांना स्पर्धा परीक्षा पुस्तके खरेदीस रूपये १००००/- (दहा हजार) मदत देण्यात येते

आर्थिकदृष्टया सक्षम नसलेल्या शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस. ला नंबर लागल्यास प्रथम वर्षाची प्रवेश फी कमाल रु. ३०,०००/- पर्यंत आर्थीक मदत देण्यात येते.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com