Agriculture News and Jobs

For Clean, Smart and Profitable Farming.

Agriculture Information In Marathi

निवासी फलोत्पादन निर्यात प्रशिक्षण अभ्यासक्रम.

प्रशिक्षणाचा उद्देश :
1) नवीन निर्यातदार घडवणे
2) कृषीमालाची निर्यातवृद्धी करणे
3) शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मुल्यवर्धन
4) परकीय चलन प्राप्त करणे
5) आंतरराष्ट्रिय बाजारपेठेमधील निर्यातीच्या संधी

प्रशिक्षणार्थी संख्या : 30

कालावधी : पाच दिवस ( प्रत्येक महित्यातील शेवटचा आठवडा )

निवास व्यवस्था : मा. विठ्ठलराव विखे पाठील सहकारी प्रबंध संस्था, पुणे.
संस्थेचे गेस्ट हाऊस, गुलटेकडी
मार्केटयार्ड, पुणे - ४१्१ 0३७

प्रशिक्षणाचे विषय :
1. ताजी फळे व भाजीपाला निर्यात संधी व पणन मंडळाचे कार्य
2. निर्यात प्रक्रिया, परवाणे, नोंदणी व विमा
3. इनव्हाईस, पॅकिंग लिस्ट, शिपिंग बिल इ. कागदपत्रांची तोंडओळख
4. उत्पादनांचा अभ्यास, एच. एस. कोड, आंतरराष्ट्रिय परिस्थिती व पणन
5. प्रमुख पिकांची निर्यातीसाठी गुणवत्ता मानके
6. पॅकिंग पॅकेंजिंग, एअर व सी शिपिंग, CHA यांच्या जबाबदाऱ्या
7. कृषिमालाची वाहतूक व पुरवठा यंत्रणा ( स्थानिक, आंतरदेशीय )
8. फळ भाजीपाल्यावर विशेष प्रक्रिया पद्धती
9. टर्मिनॉलॉजीज, UCPDC ६00, बँकिंग प्रक्रिया, पेमेंट रिस्क
10. निर्यातीसाठी RKVY, APEDA, MEIS, MSAMB व शासनाच्या योजना

प्रशिक्षणार्थी सहभागासाठी प्राधान्यक्रम :
1. कृषीमालाचे निर्यातदार होण्यास इच्छूक व्यक्ती
2. कृषि उत्पन्न बाजार समित्यांमधील इच्छूक पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी
3. जिल्हा पणन व्यवस्थापक यांचे माध्यमातून प्रगतशील व इच्छूक शेतकरी
4. पणन मंडळाकडे नोंद केलेले उत्पादक शेतकरी
5. पणन मंडळामार्फत आयात - निर्यात परवाना व इतर मार्गदर्शन प्राप्त शेतकरी

Source : https://www.msamb.com/