Agriculture News, jobs

Gram Crop Cultivation- हरभरा पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान


रब्बी हंगामात घेतल्या जाणार्या पिकांपैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. कोरडवाहू क्षेत्रामध्ये हरभरा हे रब्बी हंगामातील महविाचे पीक आहे. या पिकास शेती आणि मानवी आहारात अनन्यसाधारण असे महत्व आहे. महाराष्ट्र राज्यातील गेल्या दोन ते अडीच दशकामधील हरभरा लागवडीखालील क्षेत्र, उत्पादन आणि उत्पादकता याचे अवलोकन के ले असता, यामध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. देशाच्या एकूण हरभरा उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा १४.८४ टक्के आहे.

जमीन:
पिकासाठी मध्यम ते काळी कसदार व चांगल्या निच-याची जमीन निवडावी, हलक्या अथवा भरड, पाणथळ, चोपण किवा क्षारयुक्त जमीन हरभ-यासाठी निवडू नये. जमीनीचा सामू ५.५ ते ८.६ असावा.

हवामान:
हरभ-यास थंड व कोरडे हवामान, स्वच्छ सूयर्प्रकाश आणि पुरेसा ओलावा आवश्यक असतो व असे वातावरण पिकास चांगले मानवते. विशेषत: पीक २o दिवसांचे झाल्यानंतर कीमान तापमान सवर्साधारणत: १o अंश ते १५ अंश सें.ग्रे. आणि कमाल तापमान २५ अंश ते 30 अंश सें.ग्रे. असावे, असे तापमान महाराष्ट्रात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात असते. पूवर्मशागत: खरपिाचे पीक निघाल्यानंतर खोल काकर्या माराव्यात व कुळवाच्या दोनपाळ्या द्याव्यात. काडीकचरा वेचून जमीन स्वच्छ करावी. खरपिामध्ये शेणखत दिले नसल्यास हेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत जमीनीमध्ये मिसळावे. या प्रमाणे सप्टेंबरच्या अखेरीस पेरणीसाठी शेत तयार ठेवावे.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com