Agriculture News and Jobs

For Clean, Smart and Profitable Farming.

Agriculture Information In Marathi

वायरलेस ठिंबक सिंचन योजना- शेतकऱ्यांसाठी वरदान

सांगली : अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतीतून मोठे उत्पादन घेतात. सांगलीच्या कवलापूरमधील शेतकऱ्यांनीही आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने क्षारपड जमिनीवर द्राक्षाचं पिक घेतले आहे. वायरलेस ठिबक सिंचनाच्या माध्यमातून सांगलीतील शेतकरी द्राक्षाचं भरघोस पिक घेत आहेत.

वायरलेस ठिबक सिंचन योजना ही कवलापूरमध्ये सिद्धेश्वर सहकारी पाणी पुरवठा संस्थेने अंमलात आणली आहे. या मध्ये जवळपास 250 एकर क्षेत्र या वायरलेस ठिबक सिंचनाखाली आहे. वायरलेस ठिबक सिंचन योजना अंमलात आणण्यासाठी अनेक शेतकरी एकत्र आले आणि हि यंत्रणा अंमलात आली.

वायरलेस ठिबक सिंचन योजना-
पाण्यामुळे या भागातील जमिनी क्षारपड होत्या. कोणत्याच जमिनीतून चांगलं पीक येत नव्हते. मात्र ही स्वयंचलित वायरलेस ठिबक सिंचन योजना अंमलात आणली आणि शेतकऱ्यांना फायदा होऊ लागला.

स्वयंचलित ठिबक यंत्रणा सुरु झाली की शेतकऱ्याच्या मोबाइलवर मेसेज येतो. दररोजचं हे वेळापत्रक तयार करुन ई-मेलद्वारे पाठवण्यात येतं. यामुळे शेतीला आवश्यक तेवढं पाणी मिळण्यास मदत होते. प्रत्येकवेळी पाणी चालू करण्यासाठी शेतावर जाण्याची गरज नाही.

या योजनेसाठी कृष्णा नदीतून पाणी उचलण्यात येतं. यासाठी नदीवर 25 एचपीचे 3 पंप बसवण्यात आले आहेत. नदीतून फिल्टर युनिटला आणि तेथून शेतापर्यंत पाणी नेण्यात येतं.

टँकमध्ये पाणी एकत्र करून ते फिल्टर करून ते पाणी शेतीला सोडण्यात येतं. पाणी सोडण्याची संपूर्ण प्रक्रिया हि वेब बेस आहे. यांचा मुख्य सर्व्हर हा जळगावमधील जैन इरिगेशनमध्ये असून हा प्रोजेक्ट तिथून ऑपरेट केला जातोय.

स्वयंचलीत ठिबक सिंचन योजना असल्याने शेतकऱ्यांची मेहनतही कमी झाली आहे, शिवाय क्षारपड जमीन आणि खारं पाणी यामुळे उत्पादन देखील कमी होत होतं. पण गोडं पाणी आणि स्वयंचलीत ठिबक सिंचन योजना या शेतामध्ये राबवल्याने सध्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचं शेतकरी सांगतात.

Source: http://abpmajha.abplive.in