Agriculture News and Jobs

For Clean, Smart and Profitable Farming.

Agriculture Information In Marathi

सौर ऊर्जे द्वारे मासे सुकविने प्रशिक्षण कार्यक्रम

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापिठ अंतर्गत) येथे इच्छूक उमेदारांसाठी दोन दिवसांचा सौर ऊर्जे द्वारे मासे सुकविने (Solar drying of fish) या विषयावर दोन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रीय मत्स्य विकास बोर्ड, हैद्राबाद, यांचे सहकार्याने राबविण्यात येणार असून त्यांच्या नियम व अटि प्रमाणे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येईल याची नोंद घ्यावी. प्रशिक्षणात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थीना कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. पहिला प्रशिक्षण कार्यक्रम ७ - ८ मार्च २0१७ व दुसरा ९-10 मार्च २0१७ रोजी घेण्यात येणार असून आपले अर्ज दि. २८- 0२ - २01७ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत. प्रत्येक प्रशिक्षणाला 20 प्रशिक्षणार्थीना प्रवेश दिला जाईल.

प्रथम अर्ज प्रात्प प्रथम प्रवेश या प्रमाणे निवड केली जाईल. तरी कृपया विहित नमुनातील अर्ज भरून लवकरात लवकर पाठवावा.

अर्ज येथे उपलब्ध आहे : htt
p://www.dbskkv.org/pdf/NewsAnnouncements/Fish%20Solar%20drying%20training%207-8%20&%209-10%20March%202017.pdf

अधिक माहितीसाठी पुढील दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
कार्यालय : (0२३५२) २३२९९५

भ्रमणध्वनी क्रमांक:
१. डॉ. पगारकर – ९४२२३७१९६0
२. श्री. चोगले – ९४२११४0१४४
३. श्री. शिंदे - ९४२२९६५८४९

Source: http://www.dbskkv.org