Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

पूर्व विदर्भामध्ये हळद लागवड व प्रक्रियेतून शेतकऱ्यांची उन्नती होत आहे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी वद्यापीठ अकोला येथील उद्यानविद्या विभागामार्फत राबविण्यात येत असल्याचे मसाला पिकारील प्रकल्पा अंतर्गत वायगाव ( तु ) ता. भाद्रावतीपूर जिल्हा. चंद्रपूर येथे मसाला पिक लागवड तंत्रज्ञान या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याप्रशिक्षणास चंद्रपूर, यवतमाळ व वर्धा या जिल्यातील एक ण ८० शेतकरी सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीस श्री.पंडितराव पाटील कुरेकर यांनी त्या परिसरातील हळद व इतर पिकांच्या लागवडी विषयी माहिती दिली व वायगाव हळदीचे मुळ ठिकाण हे वायगाव ( तु ) ता. भाद्रावती हेच असल्याचे सांगितले व या प्रशिक्षणाचा हळदीची उत्पादकता वाढवण्यासाठी फायदेशीर ठरेल असे सांगितले.

अध्यक्षीय भाषनामध्ये मार्गदर्शन करतांना विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रकाश नागरेयांनी मसाला पिकाच्या लागवडीस या क्षेत्रामध्ये मोठा वाव असल्याचे सांगून वायगाव हळदीच मूळस्थान असलेल्या या गावास जागतिक नकाशावर स्थान मिळू शकते असे सांगितले. तसेच पुढील वर्षी मसाला पिकांचे विविध प्रात्याक्षिके देण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी शेतकायाांना प्रशिक्षण साहित्यामध्ये विद्यापीठाची कृषी संवादिनीचे वाटप केले.

या प्रशिक्षणामध्ये शास्त्रज्ञांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले त्यापैकी डॉ. विजय काळे यांनी हळद व अद्रक लागवड या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विविध हळदीच्या जातीची माहिती देतांना, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे वायगाव या हळदीच्या स्थानिक वाणातून पी.डी.के.व्ही, वायगाव ही सुधारित व अधिक उत्पादन देणारी व कुरकुमीचे प्रमाण जास्त असणारा वाण प्रसारित केला व हा वाण या भागासाठी निश्चीतच फायदेशीर ठरेल असे सांगितले.

तसेच हळदीची प्रक्रिया तंत्रज्ञान द्या विषयावर डॉ. उज्वल राऊत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरवातीस शेतकऱ्याच्या हळदीच्या शेतावर शास्त्रज्ञांनी भेट दिली. व काढणी केलेल्या हळदीची पाहणी केली. या कार्यक्रमास शेतकऱ्याचा मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद व कार्यमाचे व्यवस्थित आयोजन पाहून, विभाग प्रमुख डॉ. पी.के. नागरे यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

Source:https://www.pdkv.ac.in/

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com