Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

शासनाकडून मिनी ट्रॅक्टर घेण्यासाठी अनुदान

आधार संलग्न असलेल्या बँक खात्यावरच अनुसूचित जाती आणि नवबौद्घांसाठी मिनी ट्रॅक्टरचे पैसे जमा होणार आहे. बचत गटांना साडेतीन लाख रुपये मिळतील. यात ९० टक्के शासकीय, तर उर्वरित हिस्सा बचत गटांचा असेल.

९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधनांचा पुरवठा होणार आहे. या सर्व साहित्याचे पैसे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येतील. मात्र, लाभार्थ्यांकडे आधार असणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटाची निवड झाल्यानंतर कृषी मंत्रालयाच्या नियमावलीनुसार मान्यताप्राप्त उत्पादकांकडून मिनी ट्रॅक्टर व उपसाधने खरेदी करावित. स्वयंसहायता बचत गटाने मिनी ट्रॅक्टर, उपसाधने खरेदी केल्याची पावती समाजकल्याण विभागाकडे सादर करावी.

याची खातर जमा करून लाभार्थी बचत गटाला शासकीय अनुदानाचा ५० टक्के हप्ता त्यांच्या बचत गटाच्या आधार संलग्न खात्यावरच जमा करावा, अशा सूचना सर्वच समाजकल्याण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तर, उर्वरित ५० टक्के अनुदान मिनी ट्रॅक्टर, ट्रॅक्टर आणि उपसाधनांची नोंद आरटीओ कार्यालयाकडे झाल्यानंतर बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करावी.

स्वयंसहायता बचत गटांना जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे जाहिरातीद्वारे अर्ज पाठविता येतील. येत्या काळात समाजकल्याण विभागाकडून जाहिरात प्रकाशित करण्यात येईल. अर्जदारांची संख्या जास्त असल्यास समाजकल्याण सहायक आयुक्त लॉटरी पध्दतीने लाभार्थ्यांची निवड करतील. निवड झालेल्या बचत गटांची नावे समाजकल्याणच्या कार्यालयात लावण्यात येतील.

Source: http://maharashtratimes.indiatimes.com/

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com