Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पती लागवड : अद्यावत उत्पादन तंत्रज्ञान

“शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पती लागवड : अद्यावत उत्पादन तंत्रज्ञान” विषयावरील दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे कृषि विद्यापीठात आयोजन. बदलत्या जागतिक परिस्थितीत राज्यातील शेती शाश्वत व शेतकरी संपन्न होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने पुढाकार घेतला असनू येणारा खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात आल्याचे सांगताना शेतकरी बांधवांनी आता पारंपरिकतेच्या जोखडातनू बाहेर येत उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन कापूस - सोयाबीन- धान आदी पिकांची फेरपालट करून मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवडी सह फायदेशीर शेती करावी असे आवाहन कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.

एकात्मिक उद्यान पिके विकास अभियाना अंतर्गत उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला व सुपारी तथा मसाला पिके संचालनालय, कालीकत, केरळ (केंद्रीय कृषि तथा शेतकरी विकास मंत्रालय, भारत सरकार) यांचे संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालय अकोलाच्या समिती सभागृहात आयोजित "शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पती लागवड : अद्यावत उत्पादन तंत्रज्ञान" या अतिशय महत्वाचे विषयावरील दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन प्रसंगी डॉ. भाले बोलत होते.

कृषि विद्यापीठाने संशोधनाच्या दिशा बदलल्या असनू शेतकऱ्यांच्या शेतावर आता प्रयोग करण्यात येत असनू त्यांचा फायदा कमी कालावधीत नवीन पिक वान आणि तंत्रज्ञान संशोधनासाठी होणार असल्याचे सागंतांना डॉ. भाले यांनी खारपाणट्ट्यात ज्वारीचे सह ओवा, सोप, जिरे आदी पिक चांगले येत असनू विदर्भातील शेतकरी आमच्या कृषी विज्ञान केंद्रांच्या सहकार्याने ओवा, जिरे, सोप, अद्रक, हळद मोठ्या प्रमाणात घेत आहेत तथा दुध व दुग्धपदार्थ निर्मिती तंत्रज्ञान आता महिंलानी आत्मसात केले असनू शेती पूरक व्यवसायांची मोठ बांधत फायद्याची शेती दृष्टीपथात आली असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले.

शेतकरी कष्टाळू असनू त्यांना फक्त योग्य दिशादर्शन आवश्यक असल्याचे नमदू करताना डॉ. भाले यांनी करडई सारखी पिके आता पुन्हा घेणे आवश्यक असल्याचे सांगत गाव पातळीवर छोटे छोटे तेल काढणी यंत्र उभे करून पिक बदलासह कौशल्यविकास व मुल्यवर्धन आणि उपउत्पादने घेत ग्रामोद्धार साधता येईल व याकरिता शेतकऱ्यांची पंढरी असलेल्या कृषि विद्यापीठाला वेळोवेळी भेटी देत शंका समाधाना सह नव तंत्रज्ञान स्वीकारावे असेही प्रतिपादन त्यांनी केले व गुजरात, राजस्थान यांचे बरोबरीने मसाला पिकाखलील क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

सुपारी तथा मसाला पिके संचालनालय, कालीकत, केरळचे उपसंचालक डॉ. बाबुलाल मीणा यांनी मसाला पिके संचालनालयाच्या कार्यपद्धती विषयी व राबविण्यात येत असलेल्या विविध योजनाविषयी सविस्तर माहिती देतांना कसदार जमीन व सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसताना राजस्थान मसाला पिके घेण्यासाठी अग्रेसर राराहू शकतो तर जमीन व पाणी संपन्न महाराष्ट्राला या क्षेत्रात क्रांती करता येईल असा आशावाद व्यक्त केला

Source: https://www.pdkv.ac.in/

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com