Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

सोयाबीन पिकावरील चक्रभुंगा किडींचे व्यवस्थापन

विदर्भामध्ये सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. सोयाबीन पिकावरील चक्रभुंगा ही महत्त्वाची किड आहे, तरी शेतकरी मित्रांनी सोयाबीन पिकाचे वेळोवेळी सर्वेक्षण करून, म्हणून शेतकरी बंधूंनी आपल्या सोयाबीन पिकाचे नियमित सर्वेक्षण करून ह्या किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठताच नियंत्रणाचे उपाय योजावेत.

सोयाबीन पिकावरील चक्रभुंगा ही महत्त्वाची किड आहे, या किडीचा मादी भुंगा पानाच्या देठावर, फांदीवर किंवा मुख्य खोडावर साधारणतः एकमेकांपासून १ ते १.५ सें.मी. अंतरावर एकमेकास समांतर दोन गोल काप तयार करून त्यात अंडी टाकते. त्यामुळे चक्र कापाचा वरचा भाग सुकतो. अंड्यातुन निघालेली अळी पानाचे देट आणि फांदीतून आत जाते, मुख्य खोडाचा भाग पोखरते. ह्या किडीचा प्रादुर्भाव मुंग, उडीद, चवळी या पिकांवर होऊ शकतो.

पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास झाडाची पाने, फांद्या व मुख्य खोडाचा भाग वाळतो. पिक साधारणतः दिड महिन्याचे झाल्यावर चक्र भुंग्याचा प्रादुर्भाव असलेले झाड वाळत नाही, पण किडग्रस्त झाडास कमी शेंगा लागतात परिणामी उत्पादनात घट येते.

या किडीचा प्रादुर्भाव आढळून येताच चक्र काप तयार केलेली पाने देठापासून काढून टाकावीत आणि त्यांचा अंडी व अंड्यांसहित नाश करावा.

या किडीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यकते नुसार प्रोफेना फॉस ५०% प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅट्रेनिलीप्रोल १८.५० टक्के ३ मिली किंवा इथियॉन ५०टक्के प्रवाही ३०मिली किंवा थायक्लोप्रिड २१.७ टक्के प्रवाही १५मिली किंवा ट्रायझोफॉस ४०टक्के १२.५मिली यांपैकी कोणतेही एक किटकनाशक प्रति १०लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पॉवर स्प्रेअर ने फवारणी करावयाची असल्यास किटकनाशकांची मात्रा तिप्पट करावी.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com