Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

ड्रम सीडरच्या साह्याने भात रहूची पेरणी करताना घ्यावयाची काळजी


ड्रम सीडरच्या साह्याने पेरणी करताना बियाण्यास जास्त मोड येऊ देऊ नयेत. कारण जास्त मोड येऊ दिल्यास बियाणे एकमेकांत गुंतून राहते.
जिथे पेरणी करावयची आहे त्या क्षेत्रातील तण काढून स्वच्छता करावी.
ट्रॅक्टर, पॉवर टिलर किंवा नांगराने जमीन उभी आडवी नांगरून घ्यावी.
दुसऱ्या नांगरणीच्या वेळी १० टन प्रति हेक्टर या प्रमाणात चांगले कुजलेले शेणखत आणि कंपोस्ट खते मिसळून घ्यावीत.
नंतर चांगल्या प्रकारे चिखलणी करावी. फळी मारून जमीन सपाट करावी.
एका बाजूने चारी काढावी त्यामुळे अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी मदत होईल. त्याच बरोबर चिखल ओला ठेवण्यासाठी बांधही घालावा.
पाण्याची पातळी एकदम कमी ठेवावी, ज्यामुळे चिखल दिसू शकेल.
सपाट केलेल्या चिखलावर ४८ तासांपर्यंत मोड आलेला रहू मोकळे करून ड्रम सीडरच्या साह्याने चिखलावर पेरावे.
पेरणीनंतर २ ते ३ दिवसांपर्यंत पाण्याची पातळी कमी राखावी. जास्त पाऊस झाल्यास रहू वाहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.
अशा पद्धतीने भात रहूची पेरणी केल्यास उत्पादकतेत वाढ होते.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com