'
Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन प्रशिक्षण कार्यक्रम

कालावधी: दि. 23.04.2018 ते 27.04.2018

सद्य स्थितीत "निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन" व्यवस्थापनास महत्त्व प्राप्त झाले असून यातून स्वयंरोजगार निर्मितीसाठी मोठा वाव आहे. कोकण तसेच महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हयातून या व्यवसायाची व्याप्ती वाढविण्याची संधी असून, त्यासाठी प्रशिक्षण मनुष्यबळ निर्माण करण्याची गरज आहे.

यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ अंतर्गत मत्स्य संवर्धन विभाग, मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथे दि. 23.04.2018 ते 27.04.2018 या कालावधीत "निमखाऱ्या पाण्यातील कोळंबी संवर्धन" या विषयावर पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे

प्रस्तावित प्रशिक्षण कार्यक्रमासाठी :-
1. प्रत्येक प्रशिक्षणार्थी कडून प्रशिक्षण शुल्क रू 2500/- आकारले जाईल
2. प्रत्येक प्रशिक्षणार्थीने प्रशिक्षण कालावधीत आपल्या निवास आणि भोजनाची व्यवस्था स्वतः करावयाची आहे.
3. प्रशिक्षण कार्यक्रमातील सैंधातिक आणि प्रात्यक्षिक वर्गास उपस्थिती आवश्यक असून त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रशस्तिपत्रक प्रदान करण्यात येईल.

या प्रशिक्षण कार्यक्रमात कोळंबी संवर्धन: सद्यस्थिती, भविष्यातील वाटचाल संवर्धन तलाव आराखडा व बांधकाम कोळंबी बीज निर्मिती तंत्रज्ञान आणि बीज केंद्रे खाद्य व्यवस्थापन, खाद्य पुरवठा केंद्र आद्य जैवके, प्रजैवके, खनिज, उपयोग कोळंबी संवर्धन: शासनाचे सहकार्य या विषयी विस्तृत माहिती सैंधातिक आणि प्रात्यक्षिक वर्गात देण्यात येईल. या व्यतिरिक्त प्रकल्प भेटीद्वारे जागेची निकड प्रकल्प रचना याची माहिती घेता येईल.

या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नावनोंदणीसाठी डॉ. सुरेश नाईक 8275454821 व डॉ. अनिल पावसे 9422430498, मत्स्य संवर्धन विभाग, मत्स्य महाविद्यालय यांच्याशी संपर्क साधावा.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com