Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना

कृषि क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळ पिकांचा प्रमुख सहभार आहे. फळ पिकांचे बाजारमुल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळ पिकाचे अपेक्षीत उत्पन्न न आल्यास येणारा तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्या पासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्ट्टीने मदत होईल. त्यासाठी राज्यात प्राधान्याने सदरची योजना राबवण्यात येत आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकाच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादनामध्ये घट येते. पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षीत उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते. या सर्व बाबींचा विचार करुन शेतकऱ्यांना फळपिक नुकसान भरपार्ई मिळण्यासाठी एक उपाय म्हणुन पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना राबवण्याचा शासनाच्या विचाराधीन होते.

पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरु व चिकू (मृग बहार) या 5 पिकांसाठी 25 जिल्हयामध्ये महसूल मंडळ हा घटक धरुन राबचविण्यांचे प्रस्तावित आहे. त्यासाठी महसूल मंडळामध्ये किमान 20 हेक्टर् अधिसूचित फळ पिकांचे त्पादनक्षम क्षेत्र असणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत पुनर्गचित हवामानावर् आधारीत पीक विमा योजना 2018-19 मृग बहारमध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, पेरु व चिकू या 5 फळपिकांकरिता लागू करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. सदर् योजना सन 2018-19 मध्ये सहपत्र -1 मध्ये नमूद केलेल्या जिल्हयामधील तालुक्यातील महसूल मंडळात सहपत्र - 2 मध्ये निर्धारीत केलेल्या हवामान धोक्यानुसार् लागू करण्यात येईल. सदर् योजना कार्यान्वित करणाऱ्या विमा कंपन्या सहपत्र -1 मध्ये नमूद केलेल्या महसूल मंडळात महावेद प्रकल्पाद्वारे स्थापन केलेल्या संदर्भ हवामान केद्रावर् नोंदल्या गेलेल्या हवामानाची आकडेवारी आणि सहपत्र - 2 मध्ये नमूद केलेली फळपिक निहाय प्रमाणके यांची सांगड घालून शेतकऱ्यांना संबधीत विमा कंपनीमार्फत नुकसान भरपार्ई परस्पर बॅंके द्वारे अदा कर् तील. नुकसान भरपार्ईचे कोणतेही दायीत्व शासनावर् राहणार् नाही.

योजनेची उदिष्ट्टे:-
1. कमी / जा्स्त पाऊस, पावसाचा खंड व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासुन निर्धारीत केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे
2. फळपिक नुकसानीच्या अ्त्यंत कठिण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आथिक स्थैर्य अबाधित राखणे

Source: http://krishi.maharashtra.gov.in/

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com