Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

हुमळी अळी व त्यापासून पिकांचे संरक्षण

हुमळी अळी ( होलोट्रीचीया प्रजाती ) ही एक बहुभक्षी किड असून महाराष्ट्रामधे होलोट्रीचीया सेरॅटा या प्रजातीमुळे प्रामुख्याने पिकाचे नुकसान होते. ह्या किडीमुळे विविध पिकाचे ३० ते ८० टक्के नुकसान होऊ शकते.

मागील वर्षी विदर्भात बुलढाणा ( उंद्री, टाकटखेर्डा) व अकोला जिल्ह्याच्या काही भागात ह्या किडीचा प्रादुर्भाव होऊन सोयाबीन, कापुस, तूर या पिकाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

ह्या पिकाची अळी अवस्था नुकसान कारक असून ती विविध पिकांच्या मुळावर आपली उपाजिविका करते, उदा. ज्वारी, बाजरी, मका, भात, गहु, ऊस, मिरची, मुंग, करडई, वांगी, कापुस आणि सूर्यफूल ई. पिकाची मुळे खाल्यामुळे पिके उधळून जामिनीवर कोलमडून पडतात.

या किडीचे जिवनचक्र एक वर्षाचे असुन ती आपली उपजिवीका जमिनीमध्ये करते. अळी अवस्था ६ ते ८ महिन्यांची असून याच अवस्थेत ती खरीप व रब्बी पिकांची मुळे खाऊन नुकसान करते. मृगाचा पहिला पाऊस पडल्यानंतर व जमिनीतील ओलावा एकदम वाढल्यानंतर भुंगे जामिनीतून बाहेर येतात.

भुंगे २ सेंमी लांब व १ सेंमी रुंद असून रंग लालसर किंवा काळसर लाल किंवा तपकिरी रंगाचे असतात. हे भुंगे बहुसंख्येने सायंकाळी ७ ते ७.३० दरम्यान आवाज करत कडू निंब/ बाभुळ/ बोर इत्यादी झाडावर बसून कोवळी पाने खातात. तेथे सुर्योदयापूर्वी परत जमिनीत शिरून ५ ते १५ सेंमी खोलीवर अंडी घालते. अंडी ३ ते ५ दिवसात उबवून त्यातून बारीक पिवळसर अळ्या निघतात.

ज्वारी, बाजरी किंवा ऊसासाठी फोरेट १० टक्के दानेदार २५ किलो प्रती हेक्टर वापरावे. भुईमुगासाठी कार्बोफ्युरॉन ३ टक्के दानेदार ३३.३० किलो किंवा फोरेट १० टक्के दानेदार २५ किलो वापरावे. फ्रेंच बीनसाठी कार्बोफ्युरॉन ३ टक्के दानेदार २३.३० किलो प्रति हेक्टर खोडांजवळ जमिनीत ओलावा असताना मातीत मिसळून द्यावे.

कांद्यासाठी क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही ५० मिली, भुईमुगासाठी क्लोरपायरीफॉस २० टक्के प्रवाही २२.५० मिली व ऊसासाठी फिप्रोनील ४० टक्के दानेदार ५ ग्रम प्रति १० लिटर पाण्यात घेऊन द्रावण खोडांजवळ टाकावे.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com