Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

कपाशीवरील प्रमुख रसशोषक किडी व त्यांचे व्यवस्थापन

कापूस हे राज्यातील दुसरे महत्त्वाचे नगदी पिक आहे. कपाशी पिकाला रसशोषक किडीचा धोका असतो, ज्यामुळे उत्पादनात घट होते. द्रवरुप खतांचा वापर करताना माती परिक्षण अहवालाचा अभ्यास करुन खतांच्या मात्रा देणे योग्य ठरते.

मावा किडी ही एक रसशोषक किडी आहे, ती फिकट पिवळे / गर्दहिरवे / काळपट रंगाची व साधारण २ मिमी लांब असते.

पिठ्या ढेकूण रसशोषक किडी च्या शरीरावर पांढरट मेणचट आवरण असते.

तुडतुडे हे तिरके चालणारे, पंखविरहीत व हिरवट रंगाचे किडे असतात, जे पानाखाली आढळतात.

या किडींच्या व्यवस्थापनासाठी उपाय पुढीलप्रमाणे आहेत,
१) बीज प्रक्रिया –इमिडाक्लोप्रिड ७० डब्ल्यू. एस ४ ग्रॅम किंवा कार्बोसल्फान २५ डी. एस ६० ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास

२) खोड प्रक्रिया – ऑक्सीडिमेटॉन मिथील २५ ई.सी. हे आंतरप्रवाही किटकनाशक १:४ या प्रमाणात पाण्यात मिसळून कपाशी पिकाच्या हिरव्या खोडावर मध्यभागी एका बाजूने ४-५ इंच भागावर लावावे.

३) ५ % निंबोळी अर्काची फवारणी करावी.

४) क्रायसोपा अंडी ५०,०००/- प्रति हेक्टरी पिकावर सोडावीत.

५) डायमिथोएट ३० ई.सी १३ मिली ऑसिफेट ७५ एस.पी. १०ग्रॅमप्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com