Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

पंदेकृवि : सीताफळ गर व बिज निष्कासन यंत्र

कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी 'पंदेकृवि सीताफळ गर व बिज निष्कासन यंत्र विकसीत केले आहे. या यंत्रामुळे सीताफळ प्रक्रिया उद्योगास मुलभूत दिशा मिळणार आहे. या यंत्रामधुन काढलेल्या सीताफळ गरामध्ये पाकळ्या अखंड राहत असल्यामुळे गराला बाजारभाव चांगला मिळतो. त्यामुळे छोट्या फळांना बाजारात कमी भावात न विकता त्यांचा गर काढुन विकला तर त्यांचे चांगले मुल्यवर्धन होईल व शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल.

यंत्राची कार्यप्रणाली
पंदेकृवि : सीताफळ गर व बिज निष्कासन यंत्र चालवण्यास सुलभ व हाताळण्यास सोपे आहे. अकुशल मनुष्य पण या यंत्राला चालवू शकतो. हे यंत्र एक मजूराच्या साहाय्याने चालविता येते. हे यंत्र 0.5 अश्वशक्ती सिंगल फेज विद्युत मोटरवर चालविता येते. सुरुवातीला सीताफळवरील टरफल वेगळे करावे व नंतर मोठया चमच्याने बियासहित गर यंत्राच्या फिडींग चाडीमध्ये आत टाकावे. यंत्राच्या गर व बिज निष्कासन रोलर या प्रमुख यंत्रणे द्वारे गर व बिया वेगळ्या होतात. ब्रश रोलर द्वारे चांगल्या प्रतीच्या पाकळया साहित गर वेगळा केला जातो तर दंडागोलाकृती चाळण्यांद्वारे बिया वेगळ्या केल्या जातात हा साठविलेला गर सीताफळचा हंगाम संपल्यानंतर विक्री करता येते. हा गर आईसक्रीम, रबडी, शेक इ. व्यवसाय करणाऱ्यांना विकता येते.

वैशिष्ट्य
- यंत्राची क्षमता 70 ते 80 किलो प्रति तास आहे.
- यंत्र 0.5 अश्वशक्ती सिंगल फेज विद्युत मोटरवर चालते.
- हे यंत्र चालवण्यास सुलभ व हाताळण्यास सोपे आहे.
- अकुशल मनुष्य पण या यंत्राला चालवू शकतो.
- या यंत्राची गर निष्कासन क्षमता 92 ते 96 टक्के आहे.
- यंत्राद्वारे उपलब्ध गरांमध्ये 75-85 टक्के पाकळया राहतात.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com