Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

कांदा पिकाची लागवड तसेच त्यावरील रोग व कीड

महाराष्ट्रात कांद्याची लागवड खरीप हंगामात जून ते ऑक्टोबर महिन्यात करतात. कांदयांचे पीक लागवडीनंतर 3 ते 4.5 महिन्यात काढणीस तयार होते.

एन-५३ ही जात खरीप हंगामासाठी योग्य आहे. 100 ते 150 दिवसांत तयार होते. या जातीचा रंग लालभडक असतो. हेक्टरी उत्पादन 200 ते 250 क्विंटल मिळते.

खरीप व रब्बी हंगामासाठी बसवंत ७८० ही जात योग्य असून या जातीचा रंग गडद लाल असतो. कांदे आकाराने मध्यम ते मोठे असतात. ही जात 100 ते 110 दिवसात तयार होते. हेक्टरी उत्पादन 250 ते 300 क्विंटल मिळते.

खरीप कांद्यावर या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसून येतो. फूल किडे किंवा अळया हेक्टरी अगदी लहान आकाराचे किटक पाती वरील तेलकट पृष्ठभागात खरडतात. व त्यात स्त्रवणारा रस शोषतात. त्यामुळे पातीवर पांढरे ठिपके पडतात.

कांद्यावर प्रमुख रोग म्हणजे करपाहा रोग बुरशी पासून होतो. पातीवर लांबट गोल तांबूस चट्टे पडतात. शेंड्यापासून पाने जळाल्यासारखी दिसतात.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com