Agriculture News and Jobs

For Clean, Smart and Profitable Farming.

Agriculture Information In Marathi

पिक कर्जासाठी किसान क्रेडिट कार्ड

मुंबईः शासनाने शेतकऱ्यांना कर्ज मिळवणं सोपं व्हावं यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही उपयुक्त योजन शासनाने आणली आहे. या मध्ये शेतकरी बँकेकडून एटीएमप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड मिळवू शकतात आणि शेतकऱ्याने घेतलेल्या कर्जाचे पैसे लागतील तसे त्यांना आपल्या शेतीच्या कामासाठी वापरता येतात.

या योजनेमागचा मुख्य हेतू असा आहे कि शेतकऱ्यांना त्यांचे शेतीसाठीचे खर्च आवश्यकतेनुसार भागवता यावे. एटीएममधून जसे गरजेप्रमाणे पैसे काढू शकतो, तसे किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकरी पैसे काढू शकतात. यामुळे प्रत्येकवेळी कर्जासाठी प्रत्येक वेळी बँकेत जाण्याचा त्रास वाचवू शकतात.

किसान क्रडिट कार्ड मिळण्याची पात्रता अशी आहे कि,
- शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या बँकेत संपर्क साधणं गरजेचं आहे.
- कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची शेती असणं आवश्यक आहे.
- शिवाय शेतमजुर, संयुक्त शेती करणारे शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

किसान क्रडिट कार्डसाठी अर्जाची पद्धत,
- शेतकरी किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अर्ज करु शकतात.
- सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये यासाठीचे अर्ज उपलब्ध आहेत.
- शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड वापरण्याच्या अटी आणि नियमही बँकेद्वारे सांगितले जातात.
- शेतकऱ्यांनी कार्ड घेण्यापूर्वी संबंधित बँकेला आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.

Source: http://abpmajha.abplive.in/