Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

ज्वारीवरील खोड माशीवर करावयाच्या उपाययोजना

जूलै महिन्यामधे ज्वारीवर खोड माशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तरी शेतकरी बंधुनी शेताचे नियमित सर्वेक्षण करून प्रादुर्भाव आढळून आल्यास या किडीचा बंदोबस्त करावा.

किडीची माशी फिकट पिवळसर असते व आकाराने घरातील माशी पेक्षा लहान असते. मादी माशी पानावर खालचे बाजुस सुक्ष्म लांबट पांढरे अंडे घालते. अंड्यातून 2-3 दिवसात अळी बाहेर पडते व नंतर पोंग्यात प्रवेश करते.

अळी पोंग्यात शिरून आतील गाभा पोखरून टाकते. त्यामुळे रोपाचा पोंगा सुकून जातो. त्याला 'मर' असे म्हणतात. असे पोंगे सहजपणे उपसून येतात. पोंग्याचा खालील भाग सडलेला असतो व त्याचा घाण वास येतो.

या माशीचे व्यवस्थापन करण्यासाठी काही उपाय पुढीलप्रमाणे आहेत.
- पिक काढणी नंतर नांगरटी करून धसकटे जाळुन टाकावीत.
- खोड माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ज्वारीची लागवड 7 जुलैच्या अगोदर करावी.
- पेरताना बियाण्यास इमिडाक्लोप्रीड 45 टक्के एफएस 12 मिली किंवा थायामीथोक्झाम 30 टक्के एफएस 10 मिली प्रती किलो बियाण्यास लावावे
किंवा
- पेरणीच्या वेळेस फोरेट 10 टक्के दाणेदार / 18.75 किलो किंवा कार्बोफ्युरॉन 3 टक्के सीजी 33.30 किलो प्रती हेक्टर जमिनीतून द्यावे.
- ज्वारीच्या लागवडीला उशीर झाल्यास बियाण्यांचे प्रमाण जास्त वापरावे.
- शिफारशीत नत्र खताचा वापर करावा
- ज्वारीचे पीक दाटू देवू नये.
- किडग्रस्त झाडे उपटून कादुन त्यातील अळ्या नष्ट कराव्यात.
- तसेच क्लीनॉलफॉस 25 टक्के ईसी 15 ते 30 मिली किंवा मिथिल डेमेटॉन 25 टक्के ईसी 20 मिली 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com