Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

गुलाब उत्पादनाचे नियोजन व झाडांना विश्रांती देणे महत्त्वाचे

बऱ्याचदा बाजारात एकाच वेळेस माल आल्यामुळे फुलांच्या किमती उतरतात व उत्पादकाचे मोठया प्रमाणात नुकसान होते.

नुकसान टाळण्यासाठी जर फुले काढणी पुढे ढकलता आली तर उत्पादकांचा फायदा होतो. त्यासाठी फांदीवरील शेंड्याकडील भाग खुडून टाकावा म्हणजे फुलांची काढणी उशिरा सुरु होते.

युरोपला आपल्या देशात निर्यात मुख्यतः ऑक्टोबर ते एप्रिल या काळात होते. कारण या काळात थंडीमुळे तेथे फुलांचे उत्पादन होत नाही व नियंत्रित तापमानाला फुले वाढविणे फार खर्चिक होते.

इतर वेळी फुलांची निर्यात करणे आपणास फायदेशीर ठरत नाही. कारण आपली फुले त्यांच्या मालाशी स्पर्धा करू शकत नाहीत. म्हणूनच एक तर आपणास दुसरी बाजार पेठ शोधावी लागते किंवा मग अंतर्गत बाजारपेठेत कमी किमतीत विकावी लागतात व ते परवडणारे नसते. त्यामुळे या ऑफसिझनच्या काळात झाडांना विश्रांती दिल्यास पुढील काळात चांगली फुले मिळू शकतात.

झाडांना विश्रांती देण्यासाठी शेवटचे फुल काढल्यानंतर ४-८ आठवडे पाणी देऊ नये. त्याकाळात बरीचशी पाने पिवळी पडून झडून जातात. त्यानंतर मग ३०-६० से. मी. वर झाडांची छाटणी करावी.

छाटणीनंतर खते व पाणी द्यावे. त्यानंतर येणाऱ्या फुटीचे कडक उन्हापासून शेड नेट वापरून संरक्षण करावे.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com