Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

गोंदिया जिल्हा मासेमारीचे केंद्रस्थान होण्याच्या मार्गावर

राज्याच्या मासेमारीचे धोरण गोड्या पाण्याला पुढे ठेवून धोरण जाहीर करण्यात येईल. ४१ हजार कोटींचे कर्ज सागरी मासेमारी करणाऱ्यांना देण्यात आले आहे. तसेच आता नाबार्डकडून मत्स्य सहकारी संस्थांना मोठ्या प्रमाणात अर्थ सहाय्य करण्यात येणार आहे.

मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी गोंदिया जिल्हा हा भविष्यात मासेमारीचे केंद्रस्थान होईल, असा विश्वास व्यक्त केला. सडक-अर्जुनी येथे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील आयोजित मेळाव्याचे उद्घाटक म्हणून जानकर बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते.

गोंदिया तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावातून ढिवर व भोई बांधव बहुसंख्येने पारंपारिक पद्धतीने मासेमारी करून आपली उपजीविका करतात.

मासेमारी बांधवांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासोबतच मोठ्या प्रमाणात मत्स्योत्पादन घेण्यासाठी नीलक्रांती योजनेचा अधिकाधिक निधी गोंदिया जिल्ह्यासाठी देणार, असल्याचेही जानकर यांनी सांगितले.

आधी गोंदिया जिल्ह्यात मासेमारी संस्थांची नोंदणी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यात जावे लागत होते. मात्र आता या संस्थांच्या निबंधकाचे नोंदणी कार्यालय गोंदिया येथे सुरू करण्यात येईल.

सीड, फीड, मार्केटींग आणि स्कीलचा अभ्यास केला तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. मागेल त्याला मत्स्यबीज व मत्सखाद्य देण्यात येईल. त्यामुळे आता मत्स्यशेती करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com