Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

झेंडू पिकासाठीचे खत व पाणी व्यवस्थापन

झेंडूचे पीक महाराष्ट्रात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास सण-उत्सव व लग्न सोहळ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर मागणी असते.

आफ्रिकन आणि फ्रेंच जातींसाठी शेणखत २५ ते ३० मे. टन प्रति हेक्टर या प्रमाणे तसेच १०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद व २००किलो पालाश या प्रमाणे खते दयावी.

संकरीत जातींची लागवड करायची असल्यास प्रति हेक्टर नत्र २५० किलो, स्फुरद ४००किलो याप्रमाणे लागवडी पूर्वीच जमिनीत पूर्णपणे मिसळून खते द्यावीत.

सुदृढ रोपे मिळवण्यासाठी वाफ्यातील रोपांवर उगवणी नंतर एका आठवड्याने कार्बन ड्रेझीम २०ग्रॅम किंवा कॅप टॉप २०ग्रॅम प्रति १०लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्याचप्रमाणे अंतर प्रवाही कीटकनाशके व बुरशी नाशके यांच्या आठ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या द्याव्यात.

हंगाम झेंडूचे पीक घेतले असल्यास पावसाचा ताण पडल्यास १-२ वेळा १०ते१५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. कळ्या लागल्यापासून फुलांची काढणी होईपर्यंत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com