Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

महाराष्ट्रातील संशोधक ईशान्येकडील जैवसंसाधने विकसित करण्यासाठी उत्सुक

ईशान्येचे महत्त्व लक्षात घेता, राजीव गांधी सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी (RGCB),थिरुवनंतपुरम आणि नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS),पुणे यांच्या संचालकांनी ईशान्येस भेट दिली व इम्फालमधील बायोरिसोर्सेस अॅन्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट (IBSD) सोबत एक सामंजस्य करार केला.

संचालकांना ईशान्येकडे उपलब्ध असलेले अनेक अद्वितीय जैव स्त्रोत आढळले, त्यापैकी काहींचे प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी व्यावसायीकरण केले जाऊ शकते.

संशोधकांनी गेल्या 15 वर्षांपासून आयबीएसडीने घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि IBSD च्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले आणि म्हणाले की त्यांच्याकडे अद्वितीय जैव स्त्रोतांच्या विकासासाठी तंत्रज्ञान आहे.

IBSD चे डायरेक्टर प्रोफेसर दीनबंधु साहू यांनी या क्षेत्रातील अद्वितीयतेवर जोर दिला आणि म्हणाले की, RCGB,थिरुवनंतपुरम सोबतचा करार हा ईशान्य भारतातील अद्वितीय वनस्पती आणि प्राण्यांच्या आण्विक आनुवांशिक विविधतेचे विश्लेषणासाठी आणि दुर्मिळ वनस्पती आणि जनावरांसाठी ' युनिक पासपोर्ट डेटा' विकसित करण्यासाठी IBSD येथे DNA फिंगरप्रिंटसाठी प्रादेशिक सुविधा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करेल.

NCCS पुणे सोबतच्या करारामध्ये आयबीएसडीमध्ये मायक्रोबियल रेपोजिटरी सेंटर उभारणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल, ज्यामध्ये ईशान्य भारतातील विविध भागांमधून 25,000 पेक्षा अधिक मायक्रोबियल आइसोलेट्स अस्तित्त्वात आहेत आणि नॅशनल ह्युमन मायक्रोबाईम प्रोजेक्टसाठी एक प्लॅटफॉर्म देखील प्रदान करेल, असे एनसीसीएसचे संचालक डॉ. शेखर सी. माने यांनी सांगितले.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com