Agriculture News, jobs

Agriculture Information In Marathi

महाराष्ट्रातील आल्याची लागवड व त्यासाठी मिळणारे अनुदान

आल्यातील विशिष्ट चव व स्वाद यामुळे दररोजच्या जेवणातील मसाल्यात आल्याचे महत्वाचे स्थान आहे. महाराष्ट्रात आल्याच्या माहीम या स्थानिक जातीची लागवड करतात. या जातीमध्ये मोक्या व आंगऱ्या असे दोन प्रकार आढळतात.

एक हेक्टर लागवडीस साधारणपणे १४०० ते २००० किलो बेणे लागते. लागण कोरडीत करून हलके पाणी सोडून वाफे भिजवतात. गड्डा लावताना कोबांची टोके जमिनीच्या वरच्या बाजूस येतील अशी काळजी घेऊन लागण करावी.

आले कीड- रोगाला नाजूक असल्याने कंद लागवडीच्या वेळी प्रतिबंधक उपाय म्हणून डायथेन-झेड-७८ आणि नुवाक्रॉन अनुक्रमे २५० ग्रॅम आणि १०० मि. ली. , १०० लीटर पाण्याच्या मिश्रणात बुडवून लावावेत.

लागवडीनंतर १५ – २० दिवसात कोंब जमिनीच्या वर दिसू लागतात. त्यानंतर लगेच कोंबाना धक्का न लागेल अशी काळजी घेऊन वाफ्यातील तण काढून घ्यावेत. पीक १२० दिवसाचे झाल्यावर हलकी खोदणी करून दुसरा वरखताचा हप्ता द्यावा. त्यामुळे गड्ड्याची नीट वाढ होण्यास मदत होते. लागण होताच एक हलके पाणी द्यावे. पाऊसमान लक्षात घेऊन दर ६ ते ८ दिवसांनी पिकास पाणी द्यावे. पिकात पाणी साचून राहू नये याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे.

केंद्र पुरस्कृत मसाला पीक विकास योजनेअंतर्गत सुधारित जाती, तंत्रज्ञान इत्यान्दीचा प्रसार होण्याकरिता शेतकऱ्यांना आल्याचे १० आरचे प्रात्यक्षिक प्लॉटला येणाऱ्या खर्चाच्या ५० टक्के व जास्तीत जास्त रुपये १२०० देण्यात येतात.

परसबागेतील आल्याची लागवड करण्याकरिता ५ किलो बेणे आणि पीक सरंक्षणाकरिता खर्चाच्या ५० टक्के व जास्तीत जास्त रुपये १००/- चे मर्यादित.

Copyright © 2017 · All Rights Reserved · IndiaAgroNet.Com